सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर भाजप ३०० जागांचा टप्पा पार करेल – अमित शहा

47

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतरच भाजपने बहुमताचा टप्पा गाठला आहे. सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर भाजप ३०० जागांचा टप्पा पार करेल आणि एनडीए पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन करेल,  असा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी  व्यक्त केला आहे.

पत्रकार परिषदेत शहा बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांनी बोलावलेल्या बैठकीवर निशाणा साधला.  विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी त्यांनी बैठक बोलावली असावी,  असा टोला त्यांनी विरोधकांना  लगावला.

अमित शहा म्हणाले की,  मी देशभरातील अनेक भागांमध्ये फिरलो आहे. मला ज्यापद्धतीने लोकांचा प्रतिसाद पहायला मिळाला त्यावरुन पाचव्या आणि  लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात भाजपला मोठा प्रतिसाद मिळेल, असे ते म्हणाले.

विरोधकांच्या नियोजित बैठकीचा  शहा यांनी समाचार घेतला. अशा बैठकांनी भाजपला काही फरक पडत नाही. यामुळे भाजपाच्या जागा कमी होणार नाहीत. त्यांनी कदाचित विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी बैठक बोलावली असावी.