सांगवी परिसरात चार ठिकाणी वटपौर्णिमेदिवशीच महिलांच्या गळ्यातील सोने चोरट्यांनी पळवले

75

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – सांगवी परिसरात तब्बल चार ठिकाणी वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करण्यासाठी निघालेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी हिसकावून चोरु नेल्याने खळबळ उडाली आहे. या चारही घटना आज (बुधवार) सकाळच्या सुमारास कल्पतरू सोसायटी परिसर आणि पिंपळे सौदागर मधील मिलेनियम सोसायटीजवळ घडल्या.

या घटनेमुळे सांगवी परिसरातील महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे. तसेच आज वटपौर्णि असल्याने वडाची पूजा करण्यासाठी घराबाहेर जायचे कि नाही हा प्रश्न सांगवीतील महिलांना पडला आहे. त्यामुळे महिलांनी दागिने घालून बाहेर पडताना आपल्या दागिन्यांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच सांगवी पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.