सांगवीत ३० वर्षीय तरुणाचा वार करुन खून

1952

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी) – सांगवीतील औंध रुग्णालय कामगार वसाहतीजवळ एका ३० वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला आहे. ही घटना आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

अजित (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे सांगवीतील औंध रुग्णालय कामगार वसाहतीजवळ अजित नावाच्या तरुणाचा मृतदेह आढळ्याने खळबळ उडाली. माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासा दरम्यान अजित हा कामगार असल्याचे समजते. त्याच्या डोक्यावर आणि अंगावर जखमा आहेत. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करुन किंवा डोक्यात दगड घालून खून केला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सांगवी पोलिस अधिक तपास करत आहेत.