सांगवी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने मनोरंजनातून समाज प्रबोधन करणारा ‘भिम जलसा’या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपळे गुरव सांगवी येथील सृष्टी हॉटेल जवळील जय भीम चौकात शुक्रवारी (दि.१३) सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. तसेच शनिवारी ( दि. १४)  सकाळी ९:३० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुशिक्षित तरुण, तरुणींसाठी भव्य रोजगार मेळावा आणि सकाळी १० वाजता सरकारी फी मध्ये पासपोर्ट नोंदणीची प्रक्रिया पुर्ण करुन देण्यात येणार आहे.

तरी याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गुरु शोभा सामाजिक व क्रिडा संस्था, आदियाल स्पोर्टस क्लबचे संस्थापक अध्यक्ष अमरसिंग आदियाल, माजी नगरसेविका शोभाताई आदियाल यांनी केले आहे.