सांगवीत नराधम बापाकडून मुलावर अनैसर्गिक अत्याचार

958

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – एका नराधम सावत्र बापाने सहा वर्षाच्या मुलासोबतच अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मे ते जून २०१८ दरम्यान सांगवीतील राहत्या घरी घडला.

याप्रकरणी पिडीत चिमुकल्याच्या आईने सांगवी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी नराधम बापावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत सहा वर्षांचा मुलगा आपल्या आई आणि सावत्र बापासोबत सांगवीत राहतो. त्याची आई कामाला जाते तर वडील घरीच असायचे. यामुळे बायको कामाला जाताच नराधम सावत्र बाप सहा वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक कृत करत होता. हा प्रकार त्याने मे ते जून २०१८ दरम्यान केला. ही बाब लक्षात येताच पिडीत मुलाच्या आईने सांगवी पोलिसात धाव घेतली. सांगवी पोलिस अधिक तपास करत आहेत.