सांगवीत चालत्या दुचाकीवरुन महिलेची पर्स हिसकावून चोर फरार

150

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – दुचकीवरुन चाललेल्या एका महिलेची पर्स चालत्या दुचाकीवरुन हिस्कावून चोर फरार झाला आहे. ही घटना गुरुवार (दि.२६) दुपारी पावनेचारच्या सुमारास नवी सांगवीतील हॉटेल विलाकासा समोर घडली.

याप्रकरणी २७ वर्षीय महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात मोटार सायकलवरील अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी पावनेचारच्या सुमारास फिर्यादी महिला या त्यांच्या मोपेड गाडीवरुन सांगवीतील हॉटेल विलाकासा समोरुन जात होत्या. इतक्या दुचाकीवरुन आलेल्या एका अज्ञात चोरट्यांने चालत्या दुचाकीवरुन महिले जवळील पर्स जबरदस्तीने हिस्कावून चोरुन नेली. पर्स मध्ये रोख रुपये २ हजार आणि २ मोबाईल असा एकूण १२ हजार रुपयांचा ऐवज होता. सांगवी पोलिस तपास करत आहेत.