सांगवीत गावठी कट्टा आणि जिवंत काडतुस बाळगणारा गजाआड

411

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुस जवळ बाळगणाऱ्या तरूणाला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी (दि. १४) सायंकाळी सहाच्या सुमारास जुनी सांगवीतील ममतानगर येथून त्याला अटक कऱण्यात आले.

उमेश सुरेश पवार (वय २९, रा. निगडे गिरणी शेजारी, डायमंड चौक, यशवंतनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवीतील ममतानगरमध्ये गस्त घालत असताना आरोपी उमेश हा गावठी कट्टा आणि जिवंत काडतुस बाळगत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार, सांगवी पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुस पोलिसांना सापडले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून अटक केली आहे. सांगवी पोलिस तपास करत आहेत.