सांगवीतील हभप लहुजी ढोरे यांचे निधन

216

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – सांगवी येथील रहिवासी हभप लहुजी आनंदराव ढोरे (वय ७४ वर्षें) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांना सांगवी भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. सांगवीचे ग्रामदैवत श्री वेताळ महाराज उत्सव कमिटीचे अध्यक्ष सचिन ढोरे यांचे ते वडील होत.