सांगवीतील नदीपात्रात मृतदेह आढळल्याने खळबळ

366

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – सांगवीतील नदीपात्रात आज (गुरुवारी) सकाळी अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. पिंपरी अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला असून मृताची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.

मृतदेह आढळलेल्या इसमाचे वय अंदाजे ४० वर्ष असल्याचे सांगितले जात आहे.

अग्निशमन विभागाने दिलेल्या  माहितीनुसार, आज  सकाळी अकराच्या सुमारास नवी सांगवी येथे नदीपात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याची माहिती एका स्थानिक नागरिकाने पिंपरी अग्निशमन दलाला दिली. त्यानुसार संत तुकाराम अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. तीन तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृताची अद्याप ओळख पटली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी संततुकाराम नगर येथील वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.