सांगवीतील ‘द न्यु मिलेनियम’ शाळेत विद्यार्थांचे स्वागत

129

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – सांगवीतील प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या ‘द न्यु मिलेनियम पूर्व प्राथमिक शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्याचे स्वागत केले व अनेक छोटे मोठे स्पर्धा घेऊन विद्यार्थ्याचा पहिला दिवस खूप मनोरंजक केला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य बक्षीस स्वरुपात देण्यात आले.

यावेळी वर्गात विद्यार्थ्यांसाठी विविध कौशल्य, कविता, संगीत, गोष्टी, बडबडगीते  आयोजित करण्यात आली. सर्व कौशल्यात विद्यार्थ्यानी आंनदाने सहभागी होऊन विविध बक्षीसे जिंकली. या कार्यक्रमात सर्व पालकवृंद सहभागी झाले होते. विद्यार्थ्यासाठी प्रत्येक वर्ग सजविण्यात आले होते.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विजूआण्णा जगताप, सचिव शंकरशेठ जगताप, संस्था सदस्य डॉ.विकास पवार, प्रताप बामणे, चंद्रकांत इंदुरे, स्वाती पवार, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका जयश्री माळी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.