सांगवीतील दोघांना मलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सव्वा दोन लाखांचा गंडा

116

सांगवी, दि. ६ (पीसीबी) – मलेशिया या देशात चांगला पगार आणि पदाची नोकरी लावून देतो असे सांगून सांगवीतील दोन तरुणांना एकूण २ लाख १५ हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. ही घटना १३ जुलै ते १८ ऑगस्ट २०१८ दरम्यान घडली.

विजयकुमार नामदेव बिरादार (वय २८, रा. ढोरेनगर, जुनी सांगवी) आणि राहुल रविंद्र धुम्मुनसरे (रा. सांगवी) असे फसवणूक झालेल्या दोघा मित्रांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांनी सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रविंद्र वसंत पाटील (रा. बनास क्रांती टेम्पल, मराठा गल्ली, ता. गोकाक, जि. बेळगाव, कर्नाटक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सुरुवातील आरोपी रविंद्र याने विजयकुमार आणि त्याचा मित्र राहुल यांच्यासोबत फेसबुकवर ओळख केली. त्यानंतर आरोपी रविंद्र पाटील याने १३ जुलै ते १८ ऑगस्ट २०१८ दरम्यान विजयकुमार आणि त्याचा मित्र राहुल या दोघांना मलेशिया या देशातील ITW Meritex sdn.BHP या कंपनीत कामाला लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्या ई-मेलवर ITW Meritex sdn.BHP या कंपनीचे बानावत ऑफर लेटर,बनावट व्हिसा आणि मलींदा या विमान कंपनीचे बनावट तिकीट पाठवून विजयकुमार आणि राहुल या दोघांचा विषवास संपादन केला. त्यानंतर त्या दोघांना त्याच्या बँक खात्यावर प्रत्येकी १ लाख ७ हजार ५०० रुपये असे एकूण २ लाख १५ हजार रुपये पाठवायला सांगितले. यावर  विजयकुमार आणि राहुल यांनी प्रत्येकी प्रत्येकी १ लाख ७ हजार ५०० रुपये असे एकूण २ लाख १५ हजार रुपये पाठले. मात्र ITW Meritex sdn.BHP या कंपनीचे ऑफर लेटर, व्हिसा आणि मलींदा या विमान कंपनीचे तिकीट बनावट असल्याचे दोघांच्या लक्षात आले. सांगवी पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.