सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

91

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व लिटल फ्लॉवर इंग्लिश/मराठी मिडीयम स्कुलमध्ये ७२ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लिटल फ्लॉवर इंग्लिश/मराठी मिडीयम स्कुलमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता भगवान चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

तर भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या श्रेया कीर्दक या विद्यार्थीनीचे आजोबा ज्ञानेश्वर कीर्दक यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतूल शितोळे, संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे-पाटील, अधिराज शितोळे, भटू शिंदे, तसेच ज्येष्ठ नागरीक संघाचे सदस्य आदी उपस्थित होते.

दरम्यान, स्वच्छतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत मूकनाट्य सादर करीत उपस्थित पालक व विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी दहावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमानंतर चिमुकल्यांना खाऊवाटप करण्यात आले.