सांगवीतील अजित भोईया खून प्रकरणी आरोपीस अटक

83

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – सांगवीतील कामगार वसाहतीजवळ मंगळवारी (दि. ३१) अजित नंदकुमार भोईया (वय २८, रा. कामगार वसाहत, सांगवी. मू.रा. झारखंड) या तरुणाच्या डोक्यात दगड मारुन तसेच धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला होता. किरकोळ वादातून हा खून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अनिल महावीर खडिया (वय २६, रा. कामगार वसाहत, सांगवी. मू.रा. झारखंड) याला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.