सांगली महापालिकेत भाजपची सत्ता; ३६ जागांवर विजय   

537

सांगली, दि. ३ (पीसीबी) – सांगली-मिरज-कुपवाड महापालिका स्थापन झाल्यापासून सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाचा पहिल्यांदाच बुरूज ढासळला. भाजपने या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. भाजपने ३६ जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने २३ जागावर विजय मिळवला आहे. महापालिका निवडणुकीची आज (शुक्रवार) मतमोजणी झाली.  

सांगली महापालिका निवडणुकीच्या ७८ जागांसाठी ४५१ उमेदवार रिंगणात उतरले होते. सांगलीचा गड राखण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. तर सत्तास्थापनेचा निर्धार भाजपने केला होता. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीचे निवडणूक कल बघता भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. त्यानंतर भाजपने अनपेक्षित मुसंडी मारली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, भाजपने ३६ जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने २३ जागांवर विजय मिळवला आहे.