सांगली, कोल्हापूरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वेश्या देखील सरसावल्या

248

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरातील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी आता वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला देखील सरसावल्या आहेत.

मुंबईतील कामाठीपुरा येथील या महिलांनी ‘सिस्टर्स ऑफ कामाठीपुरा’या संस्थेमार्फत पूरग्रस्तांना मदतनिधी दिला आहे. ही माहिती वेश्या आणि तत्सम पीडितांचे दु:ख मांडणाऱ्या, वेश्या महिलांसाठी समाजकार्य करणाऱ्या समीर गायकवाड यांनी दिली आहे.

समीर गायकवाड यांनी ‘मदतीची भावना सगळ्यांची असते अगदी त्यांचीसुद्धा असते ज्यांचे आयुष्यभर शोषण झालेले असते. एक छोटीशी मदत समाजाने झिडकारलेल्या वेश्यांकडून. सेक्सवर्कर्स भगिनींचा निधी किती रकमेचा आहे हे गौण आहे, त्यांच्या भावना मानवतेच्या अत्युच्च पातळीच्या आहेत हे मात्र नक्की अशी फेसबुक पोस्ट गायकवाड यांनी केली आहे.