सांगलीतील सराईत गुन्हेगाराला तळवडेतून दोन पिस्तूलांसह अटक

126

भोसरी, दि. ३० (पीसीबी) – सांगलीतील रेकॉर्ड वरील एका सराईत गुन्हेगाराला देहुरोड पोलिसांनी दोन गावठी पिस्तूलांसह अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवार (दि.२९) रात्रीच्या सुमारास तळवडे येथील कॅनबे चौका जवळ करण्यात आली.

विशाल मधुकर खेडेकर (वय २४, रा. तासगाव, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल खेडेकर हा सराई गुन्हेगार आहे. त्याच्या विरुध्द सांगली, तासगाव आणि देहुरोड येथे खुनी हल्ला करणे, दहशत माजवने, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, मोक्का तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी तो बऱ्याच दिवसांपासून फरार होता. मात्र देहुरोड पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून त्याला अटक केली.

ही कारवाई डीवायएसपी जी.एस.माडगूळकर, पोलीस निरीक्षक धस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सावंत, पोलीस नाईक प्रमोद उगले, जगदाळे, जाधव आणि शेळके यांच्या पथकाने केली.