सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री मराठा आंदोलकांसोबत चर्चा करणार

119

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  आज (रविवार) पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  सह्याद्री अतिथीगृहावर आंदोलकांसोबत चर्चा करणार आहेत. खासदार नारायण राणे देखील  या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

या बैठकीत काय चर्चा होते, याची माहिती सर्व मराठा आंदोलकांना व्हावी, यासाठी बैठकीचे थेट प्रक्षेपण करण्याची मागणीही नारायण राणे यांनी केली होती. त्यानुसार या बैठकीचे लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येणार आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर ही चर्चा होणार आहे. या बैठकीत काय होते, याकडे मराठा आंदोलकांचे लक्ष लागून राहिले आहे.