सहा पंपहाऊसच्या दुरुस्तीवर पाऊणकोटींचा खर्च..

60
ç·¤àæٻɸU ·ð¤ ¥æÁæÎ Ù»ÚU ´ ãUæ©Uâ ×ð´ çÙ×æü‡æŠæèÙ ÙØæ ÖßÙÐ

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत महापालिकेच्या सेक्टर 10, गवळीमाथा तसेच लांडेवाडी, दिघी, चोली आणि बोपखेल येथील शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या पंपहाऊसची दुरुस्तीविषयक कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी दोन स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवून एकाच ठेकेदाराला काम देण्यात येणार आहे. त्यासाठी 72 लाख 16 हजार रुपये खर्च होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. शहरात दररोज 450 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरात ठिकठिकाणी शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी पंप हाऊस आहेत. या पंपहाऊसची वार्षिक चालन आणि देखभाल-दुरुस्ती ठेकेदारांमार्फत करण्यात येते. महापालिकेचे थेरगाव गावठाण, लक्ष्मणनगर, काळाखडक, वाकड, पुनावळे, सांगवी गावठाण, सांगवी पीडब्ल्यूडी, पिंपळे-गुरव, रहाटणी, दापोडी, कृष्णानगर, पाटीलनगर, जाधववाडी, भोसरी गवळीमाथा, लांडेवाडी, दिघी, च-होली आणि बोपखेल येथे पंपहाऊस आहेत.

महापालिकेच्या सेक्टर 10, गवळीमाथा तसेच लांडेवाडी, दिघी, च-होली आणि बोपखेल येथील शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या पंपहाऊसची दुरुस्तीविषयक कामे करण्यात येणार आहेत. सन 2022-23 साठी करण्यात येणाऱ्या या कामांसाठी दीड वर्षे कालावधीकरिता इच्छुक ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. सेक्टर 10 व गवळीमाथा येथील पंपहाऊसच्या दुरुस्तीविषयक कामासाठी वेगळी आणि लांडेवाडी, दिघी, च-होली व बोपखेल येथील पंपहाऊसच्या दुरुस्तीविषयक कामासाठी वेगळी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. दोन्ही निविदा प्रक्रियेत पंपहाऊसच्या दुरुस्तीसाठी 44 लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला.

सेक्टर 10 व गवळीमाथा येथील निविदा प्रक्रियेत चार ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये एक्सेल इंजिनीअरिंग यांनी निविदा दरापेक्षा 18.90 टक्के कमी म्हणजेच 35 लाख 68 हजार रुपये दर सादर केला. त्यांचा दर लघुत्तम असल्याने निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. तसेच लांडेवाडी, दिघी, च-होली व बोपखेल येथील निविदा प्रक्रियेत तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्येही एक्सेल इंजिनीअरिंग यांनी निविदा दरापेक्षा 17.10 टक्के कमी म्हणजेच 36 लाख 47 हजार रुपये दर सादर केला. त्यांचा दर लघुत्तम असल्याने निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. या दोन्ही कामांसाठी 72 लाख 16 हजार रुपये खर्च होणार आहे.