सहकारनगरमधील जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

78

पुणे, दि. ९ (पीसीबी) – जलतरण तलावात बुडून एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि.८) सकाळी साडेआठच्या सुमारास सहकारनगर येथील पुणे महापालिकेच्या जलतरण तलावात घडली.

सुरज शरद गायकवाड (वय २८, रा. बिबवेवाडी, अप्पर ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात अकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज हा रविवारी आपल्या काही मित्रांसोबत सहकारनगर येथील पुणे महापालिकेच्या जलतरण तलावात पोहायला गेला होता. यावेळी तो अचानक पाण्यात बुडत असल्याचे तेथील प्रशिक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी सुरजला तलावातून तातकाळ बाहेर काढले. तसेच त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सहकारनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.