ससून रुग्णालयातून नेटवर्किंगचे लाखोंचे साहित्य चोरट्यांनी पळवले

58

पुणे, दि. २७ (पीसीबी) –  ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीत ठेकेदाराने ठेवलेले ४ लाख ८३ हजार रुपयांचे संगणकविषयक (नेटवर्किंग) साहित्य चोरट्यांनी पळवल्याचे समोर आले आहे.  ही घटना मंगळवार (दि.३) ते सोमवार (दि.२३ जुलै) दरम्यान घडला.

याप्रकरणी ठेकेदार मनोजकुमार गडकर (वय ४८, रा. मालाड, मुंबई) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात  फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयाच्या आवारात नवीन इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीच्या अकराव्या मजल्यावर एका खोलीत गडकर यांनी संगणकविषयक साहित्य (नेटवर्किंग) ठेवले होते. चोरट्यांनी खोलीतून हे ४ लाख ८२ हजार २०७ रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. गडकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ससून रुग्णालयाच्या सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षारक्षक देखील नेमण्यात आले आहेत. मात्र तरीही नवीन इमारतीमधून साहित्य चोरीला गेल्याने येथे सुरेक्षाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस. ए. जमदाडे तपास करत आहेत.