सलमान खानला सर्प दंश; वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी फार्म हाऊसवर गेला होता…

589

पनवेल, दि. २६ (पीसीबी) – बॉलिवूडचा सुपस्टार सलमान खान याला शनिवारी रात्री साप चावला आहे. सलमानला त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर सापानं चावा घेतला. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सलमानच्या पीआर टीमकडून सांगण्यात आलंय की, “सलमानला साप चावल्याची बातमी खरी आहे. काल रात्री साप चावल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. सहा तासांनी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून पनवेलमधील फार्म हाऊसवर तो सध्या आराम करत आहे.”

सलमान खानचा सोमवारी (27 डिसेंबर) रोजी वाढदिवस आहे. दरवर्षीप्रमाणे वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी सलमान फार्म हाऊसवर गेला होता. मात्र, शनिवारी त्याला सापानं चावा घेतल्यामुळं त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं.