सलमानच्या जीवावरचा धोका कायम; तीन आरोपी मुंबईत मोकाट

163

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानच्या जीवावरचा धोका अजूनही कमी झालेला नाही. सलमानला मारायला आलेला शार्पशूटर संपत नेहरा याला हरियाणा पोलिसांनी नुकतीच अटक केली. संपतच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राजू, अक्षय आणि अंकित हे त्याचे तीन साथिदार अजूनही मुंबईत मोकाट फिरत आहेत. या तिघांना अजून पकडण्यात आले नसल्यामुळे सलमानच्या जीवाला धोका अजूनही कायम आहे, अशी माहिती संपत याने चौकशी दरम्यान दिली. यामुळेच मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

राजू, अक्षय आणि अंकित या तिघांचा शोध मुंबई पोलीस घेत आहे. तिघांचा ठाव ठिकाणा मिळवण्याचे काम मुंबई पोलीस करत आहे. या तिघांना गजाआड करेपर्यंत सलमानच्या जीवाला धोका असेल असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.