सलमानचा बॉडीगार्ड शेराचा सांगलीत ‘आरोग्यरत्न’ पुरस्काराने सन्मान

197

सांगली, दि. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा अंगरक्षक म्हणून ‘शेरा’ची  ख्याती सर्वदूर पसरली आहे. नुकताच सांगलीमध्ये महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शेराचा ‘आरोग्यरत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

सांगलीच्या श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या वतीने ‘आरोग्यरत्न’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सलमान खानचा अंगरक्षक गुरमीतसिंग उर्फ शेरा याला यावेळी ‘आरोग्यरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. चांदीची गदा, मानपत्र, रोख रक्कम असे या ‘आरोग्यरत्न’ पुरस्काराचे स्वरूप आहे.