सलग दिवशी निगडी, पिंपरी, सांगवी मधून चार दुचाकी चोरीला

15

निगडी, दि. २१ (पीसीबी) – निगडी आणि सांगवी मधून प्रत्येकी एक तर पिंपरी मधून दोन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. रविवारी (दि. 20) याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सागर सतीश भोसले (वय 30, रा.यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोसले यांची 40 हजारांची पल्सर दुचाकी (एम एच 11 / बी यु 2190) अज्ञात चोरट्यांनी आकुर्डी येथील फोर्स मोटर्स कंपनीच्या गेट समोरून चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

ऋषिकेश श्रीधर नाईकडे (वय 22, रा. नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नाईकडे यांची एक लाख 20 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / एफ आर 1405) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंग मधून चोरून नेली. याप्रकरणी रोहित राजेश वेर्णेकर (वय 23, रा. डी पी रोड, औंध, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

पिंपरी पोलीस ठाण्यात रामलाल लुंबाराम चौधरी (वय 31, रा. संभाजी नगर, चिंचवड) आणि सागर सुरेश चाळके (वय 30, रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. चौधरी यांची 25 हजारांची मोपेड दुचाकी (एम एच 14 / एफ झेड 9253) आणि चाळके यांची 17 हजारांची पल्सर दुचाकी (एम एच 14 / सी टी 4690) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare