सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या जयंती व राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त ‘ग’ प्रभाग कार्यालयाच्या वतीने अभिवादन

49

पिंपरी,दि.१५( पीसीबी) – आज सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त ग प्रभाग कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

ग प्रभाग अध्यक्ष श्री बाबासाहेब त्रिभुवन यांचे अध्यक्षतेखाली व क्षेत्रीय अधिकारी श्री दांगट साहेब व कार्यकारी अभियंता श्री गट्टूवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला. तसेच स्वीकृत सदस्य श्री संदीप गाडे, गोपाळ मळेकर ,सर्व विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक उपस्थित होते . यावेळी अभियंता दिनानिमित्त सर्व अभियंता वर्गाचा सत्कार करणेत आला.

WhatsAppShare