सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्स अॅपला फटकारुन बजावली नोटीस

169

दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवारी) व्हॉट्स अॅपला फटकारुन एक नोटीस बजावली आहे.  या नोटीसीत भारतात अद्याप तक्रार निवारण अधिकाऱ्याची नेमणूक का करण्यात आलेली नाही याचे स्पष्टीकरण देण्यास व्हॉट्स अॅपला सांगितले आहे. व्हॉट्स अॅपसोबतच संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय व अर्थमंत्रालयालाही ही नोटीस पाठवण्यात आली असून नोटिशीला उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत दिली आहे.

गेल्या आठवड्यात व्हॉट्स अॅपचे सीईओ ख्रिस डॅनियल्स हे भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी  केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली होती. या भेटीत भारतात व्हॉट्स अॅपचे कार्यालय सुरु करावे, भारतात तक्रार निवारणासाठी अधिकारी नेमावेत तसेच भारतीय कायद्याचे पालन करावे या तीन मुख्य सूचना भारत सरकारने केल्या होत्या.