सर्वसामान्यांच्या हक्कासाठी भापसे लढा उभारणार -दीपक ताटे

259

जुनी सांगवी, दि. २१ (पीसीबी)- पिंपरी चिंचवड शहरात कामानिमित्त आलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.यात मराठवाड्यासह विविधभागातून आलेला बहुतांश कष्टकरीवर्ग भाड्याच्या घरात राहतात. तर यातील मोठ्या संख्येने झोपडपट्टीत राहातात. शहराच्या विकासात या कष्टकरी वर्गाचे योगदान कुणालाही दृष्टीआड करता येणार नाही. असंख्य कुटुंब तुटपुंज्या पगारावर घरभाडे भरत जिवन व्यतीत करत आहे. अशा कष्टकरी वर्गाला हक्काचा निवारा मिळण्यासाठी भापसे गेली एक दशकापासून शासन दरबारी न्याय हक्कासाठी काम करत आहे. झोपडपट्टी पुनर्वसन त्या त्या जागेवरच करून गेली तीस ते चाळीस वर्षापासून राहणा-या नागरीकांना हक्काच्या निवा-यासाठी लढा उभारणार आहे. याचबरोबर शहरातील कचराप्रश्न, वाहातूकीची समस्या आदी प्रश्नांवर भापसे काम करणार असल्याचे पिंपरी येथे भापसे कार्यकर्ता मेळाव्यात दिपक ताटे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनाचे औचित्यसाधून पिंपरी येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात महापुरूषांना अभिवादन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. तर माजी उपमहापौर झामाबाई बारणे यांच्या हस्ते भापसे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मेळाव्यास शिवशाही व्यापारी संघाचे युवराज दाखले, प्रा. व्यंकटराव वाघमारे, महीला आघाडी अध्यक्षा जयश्री ताटे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिल्पाताई गायकांबळे यांनी केले.मेळाव्यास विविध भागातून आलेले कष्टकरी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रम यशस्वितेसाठी शोभा वैरागे, लताताई गायकवाड, सुनंदा पाटील, शिवाजी सुर्यवंशी, बंडु ताटे, लक्ष्मण झाडे, धनंजय ताटे आदींनी परिश्रम घेतले.

WhatsAppShare