सर्जिकल स्ट्राइक साठी नव्या विभागाची स्थापना; लष्कर, नौदल, हवाई दलातील कमांडोंचा समावेश

96

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) –  भविष्यात  सर्जिकल स्ट्राइक सारखे ऑपरेशन्स आणि गुप्त मोहिमा पार पाडण्यासाठी एका नव्या विभागाची स्थापना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.  या स्पेशल ऑपरेशन डिव्हिजनमध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलातील कमांडोंचा समावेश करण्यात येणार आहे.

लष्कराच्या स्पेशल फोर्सेसमधील मेजर जनरल रँकचा अधिकारी नव्या विभागाचा प्रमुख असेल.  या स्पेशल ऑपरेशन डिव्हिजनचे काम सुरु होणार आहे. स्पेशल ऑपरेशन डिव्हिजनमध्ये सध्या नियुक्तीचे काम सुरु आहे. स्पेशल फोर्सेसमध्ये असणारे तिन्ही सैन्य दलाचे कमांडो स्वतंत्रपणे काम करतील, असे एका अधिकाऱ्यांने सांगितले.

देशांतर्गत आणि देशाबाहेरील मोहिमांची गुप्तपणे अंमलबजावणी  हा विभाग करेल. कमांडोंचे हे विशेष पथक सीमेपलीकडे जाऊन दहशतवादी तळांना त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरना लक्ष्य करेल. लष्कराचे पॅरा कमांडो, नौदलाचे मार्कोस आणि हवाई दलाचे गरुड कमांडो या विशेष पथकाचा  भाग असतील. सुरुवातीला या स्पेशल फोर्सेसमध्ये दीडशे ते दोनशे कमांडो असतील. त्यानंतर  २ हजार कमांडोंची सुसज्ज फोर्स उभारण्याची योजना आहे.  इतर दोन सैन्य दलांपेक्षा लष्करातील कमांडोंची संख्या जास्त असेल.