सराईत गुन्हेगार अक्षय सातपुते आणि शुभम धोत्रे एका वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार

356

पुणे, दि. १२ (पीसीबी) – शहर परिसरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेले सराईत गुन्हेगार अक्षय सुनिल सातपुते (वय २०) आणि शुभम संजय धोत्रे (वय २१, दोघेही रा. संभाजीनगर, धनकवडी) या दोघांना परिमंडळ २ चे पोलीस उप आयुक्त डॉ. प्रविण मुंढे यांनी बुधवार (दि.११ जुलै २०१८) पासून पुणे शहर व जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार केले आहे.
या दोघांविरोधात शहरपरिसरात शस्त्राने गंभीर दुखापत करणे, सामाईक इरादा, घातक हत्यार जवळ बाळगणे, बेकायदेशिर जमावात सामील होणे, दंगा करणे, प्राणघातक हल्ला करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
तरी हे दोघे पुणे जिल्ह्यात कोठेही आढळल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन परिमंडळ २ चे पोलीस उप आयुक्त डॉ. प्रविण मुंढे यांनी केले आहे.