सरपंच सुवर्णा गायकवाड यांची भाजपा युवती आघाडीच्या मावळ तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती

68

वडगाव मावळ, दि.०२ (पीसीबी) : मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या मावळ युवती आघाडीच्या अध्यक्षपदी क्रांबे नामाच्या सरपंच सुवर्णा गणेश गायकवाड यांची नियुक्ती जाहिर करण्यात आली.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, पंचायत समिती सभापती ज्योती शिंदे, माजी उपसभापती दत्तात्रय शेवाळे, गणेश गायकवाड, शांताराम कदम, गुलाबराव म्हाळसकर, सुनिल चव्हाण, विजय टाकवे, विशाल भांगरे, नितिन घोटकुले, गणपत सावंत, रविंद्र आंद्रे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपा पक्षाची ध्येयधोरणे जनमानसांत पोहचवत महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करणार असल्याचे सुर्वाणा गायकवाड यांनी सांगितले.