सरकार बदलण्याची वेळ आली आहे – मनमोहन सिंग

65

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – मोदी सरकराने देशाचे हित नसणाऱ्या अनेक गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे आता सरकार बदलण्याची वेळ आली आहे, अशी टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज (रविवार) येथे केली.

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने आज ‘भारत बंद’ पुकारला आहे. दिल्लीमधील रामलीला मैदानावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासहित विरोधी पक्षनेते एकत्र आले आहेत. यावेळी  मनमोहन सिंग बोलत होते.