सरकारविरोधी मत मांडल्याने नव्हे तर माओवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी पाचही विचारवंतांवर  कारवाई पोलिसांचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

108

दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी कवी वरवरा राव, अॅड. सुधा भारद्वाज, अॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलाखा या पाच जणांना अटक केली होती. मात्र, या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली. सुप्रीम कोर्टाने पाचही आरोपींच्या अटकेला स्थगिती देत त्यांना घरात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते. आज (बुधवार) सुप्रीम कोर्टात या याचिकेवर सुनावणी झाली.

सुनावणी दरम्यान महाराष्ट्र पोलिसांनी सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामध्ये सरकारविरोधीत मत मांडल्याने नव्हे तर सीपीआय (माओवादी) या बंदी असलेल्या संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.