सरकारकडून मराठा आंदोलकांवर सुडबुद्धीने गुन्हे केले; धनंजय मुंडेचा आरोप

78

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर सुडबुद्धीने गुन्हे दाखल केल्याचा आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. आंदोलकांवर दगडफेक, जाळपोळ, खुनाच्या प्रयत्नांसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याची राज्य सरकारची कारवाई सूडाची आहे. त्याचा निषेध धनंजय मुंडे यांनी केला आहे. सरकारने ही कारवाई तात्काळ थांबवून मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.