समीर वानखेडेंनी दिल स्पष्टीकरण; “मी मुस्लीम पद्धतीने विवाह केला कारण….”

154

मुंबई, दि.२७ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी NCB चे मुंबई संचालक समीर वानखेडे यांच्या लग्नावरून गंभीर आरोप केले. यानंतर आता स्वतः समीर वानखेडे यांनी या विषयावर खुलासा केला आहे. ज्यामध्ये त्यांनी मुस्लीम पद्धतीने विवाह का केला याचं कारणही सांगितलंय. “माझी आई मुस्लीम होती, बाबा हिंदू आहेत. मी दोघांवरही खूप प्रेम करतो. माझ्या आईने मुस्लीम पद्धतीने विवाह करण्यास सांगितला आणि तो मी केला,” असं मत समीर वानखेडे यांनी व्यक्त केलं.

“भारत हा पुरोगामी देश आहे त्याचा मला अभिमान आहे. माझी आई मुस्लीम होती, बाबा हिंदू आहेत. मी दोघांवरही खूप प्रेम करतो. माझ्या आईने मुस्लीम पद्धतीने विवाह करण्यास सांगितला तो मी केला. कारण मी आईचा शब्द पाळला, मी गुन्हा केला नाही. ज्या महिन्यात निकाह झाला त्याच महिन्यात मी विशेष विवाह कायद्यानुसार नोंदणी करून घेतली. मी जे केलं तो गुन्हा नाहीये”, असा खुलासा समीर वानखेडे यांनी केला आहे.

WhatsAppShare