समाज म्हणून ही घटना सगळ्यांनाच मान खाली घालायला लावणारी आहे – नितीन गडकरी

81

मुंबई,दि.१०(पीसीबी) – समाज म्हणून ही घटना आपल्या सगळ्यांनाच मान खाली घालायला लावणारी आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची सात दिवसांपासून सुरु असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. तिने आज सकाळी ६.५५ वाजता अखेरचा श्वास घेतला. या घटनेवर नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नितीन गडकरी यांनी, हिंगणघाट येथील अमानुष कृत्याची बळी ठरलेल्या तरूणीला माझी भावपूर्ण श्रद्धांजली, असं नितीन गडकरी यांनी म्हटलंय. या घटनेतील आरोपींवर सरकार कठोर कारवाई करेल हा विश्वास आहे, पुन्हा अशी घटना घडणार नाही याची सरकार आणि समाज दोघांनीही दक्षता घ्यायला हवी, असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू होती, ती सोमवारी सकाळी ६.५५ मिनिटांनी संपली. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना पीडितेनं सकाळी अखेरचा श्वास घेतला. पीडितेच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. राजकीय नेत्यांसोबत कलाविश्वातूनही या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं जात आहे.