समाजाच्या विविध घटकांतील महिलांना पाठवल्या शिवबंधनाच्या राख्या

83

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – कामगार नेते इरफान सय्यद यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात विविध घटकांमध्ये काम करणाऱ्या सुमारे तीन हजार महिलांना शिवबंधनाच्या राख्या पाठवण्यात आल्या. तसेच त्यांच्या संरक्षण्याचे वचनही त्यांनी राखीसोबत दिले आहे.

शहरातील कचरावेचक, भाजी विक्रेत्या, डॉक्टर, नर्स, शिक्षिका, पोलिस, वकील, बांधकाम कामगार, कंपनीच्या महिला कामगार आणि अधिकारी, गृह उद्योजक अशा विविध घटकातील महिलांना इरफान सय्यद यांनी विशेष शिवबंधनाची राखी पाठवली आहे. अनेक महिला कार्यकर्त्यांनी त्यांना राख्या पाठवल्या आहेत. तर काही महिला-भगिनींनी स्वतः भेटून राख्या बांधल्या.

कामगारांच्या प्रश्नांवर काम करत असताना महिलांची सुरक्षा, सक्षमीकरण व शिक्षण याविषयावर देखील काम करत असून आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात विजयी पताका फडकावली आहे. घर सांभाळून काम करणाऱ्या महिलांप्रती आदर व्यक्त करावा, तेवढा कमी आहे. महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या पंखांमध्ये आणखी बळ भरण्यासाठी हा उपक्रम राबवला असल्याचे  सय्यद यांनी सांगितले.