समलैंगिक सेक्सला नकार दिल्याने पुण्यात तरूणावर सपासप वार

0
7443

पुणे, दि. २१ (पीसीबी) – समलैंगिक सेक्सला नकार दिल्याने २४ वर्षीय तरूणावर भर रस्त्यात तीन जणांनी मिळून चाकूहल्ला केला. ही घटना आज (रविवारी) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील टिळक रोडवरील गिरीजा हॉटेलजवळील एका बसस्टॉपवर घडली. या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भर रस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच घबराट उडाली.

दिनेश उर्फ सुरेश कांबळे (वय २४) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी मयूर मोतीराम राठोड (वय १८) महेश धनेश तिवारी (वय १८) आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळक रोडवरील काका हलवाई या मिठाई दुकानाच्या समोरील बाजूस असणाऱ्या बस स्टॉपजवळ दिनेश उर्फ सुरेश कांबळे हा तरुण दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास थांबला होता. तेवढ्यात मयूर , महेश आणि आणखी एक अल्पवयीन मुलगा याठिकाणी आले. त्यांनी दिनेशला समलैंगिक सेक्स करण्यात मागणी केली. परंतू, दिनेशने या मागणीला नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला आणि हा वाद विकोपाला जाऊन तिन्ही आरोपींनी दिनेश याच्यावर चाकूने सपासप वार केले.

या अचानक झालेल्या हल्ल्यात दिनेश गंभीर जखमी झाला आणि खाली कोसळला. तर आरोपींना याठीकाणहून पळ काढताना नागरिकांनी पकडून ठेवले. पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पकडलेल्या तिन्ही संशयित आरोपींना नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात केले. तर हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला त्वरित ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर पुढील उपचार सुरु आहेत. खडक पोलिस तपास करत आहेत.