समलैंगिक संबंध नैसर्गिक नाहीत; राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा विरोध   

164

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – समलैगिंक संबंधांना आम्ही गुन्हा मानत नाही. मात्र, काही स्वरुपाचे समलैंगिक शरीरसंबंध हे नैसर्गिक नाहीत. तसेच सामजिकदृष्ट्या स्विकारार्ह नाहीत, त्यामुळे आमची अशा संबंधांना पाठींबा नाही, असे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी म्हटले आहे.

परंपरेनुसार अशा भारतीय समाजात अशा संबंधांना मान्यता दिली जात नाही. एक व्यक्ती आपल्या अनुभवाने शिकतो. त्यामुळे या प्रकरणाला सामाजिक आणि मनोवैज्ञानिक स्तरावर सोडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मत अरुण कुमार यांनी व्यक्त केले आहे.

समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) कलम ३७७ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवारी) निकाल दिला. समलैंगिकांनाही समान अधिकार आहेत, त्यामुळे दोन सज्ञान व्यक्तींनी ठेवलेले संबंध ही खासगीबाब आहे, त्यामुळे तो गुन्हा ठरत नाही, असा ऐतिहासिक निर्णय न्यायालयाने  दिला. दरम्यान, विविध पक्ष संघटनांनी या निकालाचे स्वागत केले आहे.