समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

65

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – एकमेकांच्या संमतीने ठेवल्या जाणाऱ्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल आज (गुरूवार) सर्वोच्च न्यायालयाने दिला.  परस्परसंमतीने ठेवल्या जाणाऱ्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) कलम ३७७ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर हा निकाल देण्यात आला आहे. या निकालामुळे समलैंगिक समुदायाला दिलासा मिळाला आहे.