सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात २ दिवसच बँका चालू ; आताच कामे उरका

858

मुंबई,  दि. ३० (पीसीबी) –  नागरिकांनी बँक आणि पैशांच्या  व्यवहारांची कामे  शनिवारपर्यंत ( दि.१) करून घ्यावीत. कारण  सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बँका केवळ २ दिवसच चालू राहणार आहेत. त्यामुळे  आवश्यक असलेली बँक  कामे शुक्रवार आणि  शनिवारपर्यंत उरकून घ्यावीत.  

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बँकांना एकूण ४ दिवस सुट्ट्या आहेत.  या काळात एटीएममध्ये सुद्धा पैशांचा पुरेसा  पुरवठा  होण्याची शक्यता कमी आहे.  त्यामुळे  नागरिकांनी बँक व्यवहारची कामे दोन दिवसांत पूर्ण करून घ्यावीत. कारण एटीएममध्ये सुद्धा पैशांचा तुटवडा जाणवू शकतो.

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ६ सप्टेंबर रोजी रविवारी असल्याने साहजिकच बँका बंद असतील . यानंतर ३ सप्टेंबर रोजी कृष्ण जन्माष्टमीची सुट्टी आहे. ४ आणि ५ सप्टेंबरला पेन्शन आणि इतर मागण्यांसह बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे, या दोन्ही तारखांना बँकेचा व्यवहार ठप्प राहील.

६ आणि ७ सप्टेंबर रोजी बँका खुल्या राहतील. परंतु, यानंतर लगेच २ दिवस बँकांना सुट्टी आहे. ८ सप्टेंबर रोजी दुसरा शनिवार आणि ९ तारखेला रविवार आहे. संप आणि सुट्ट्यांच्या काळात पैशांचा पुरवठा सुद्धा होणार नाही