सनातन संस्थेवर बंदी घाला; अशोक चव्हाणांची मागणी 

132

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – देशाच्या धर्मनिरपेक्षतेवर सनातन संस्थेच्या लोकांकडून घाला घातला जात आहे.  धर्माचे ध्रुवीकरण करण्याचा त्यांचा डाव आहे. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा हात आहे, त्यामुळे सनातन संस्थेवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

चव्हाण म्हणाले की, दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या धडक कारवाईत सुरुवातीला २० बॉम्ब आणि स्फोटके आढळून आली  आहेत. त्यानंतर आणखी ५० बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी सनातनसंस्थेच्या वैभव राऊतसह इतर १४ लोकांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी केलेल्या कारवाईत तीन हिंदुत्ववादी अतेरिक्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून काही स्फोटके आणि ती तयार करण्याची सामग्री जप्त करण्यात आली होती. त्यानंतर या तरुणांच्या चौकशीदरम्यान सुधन्वा गोंधळेकर याने आणखी शस्त्रसाठा लपवल्याची माहिती समोर आली.