सनातन संस्थेची विघातक कार्यपध्दती मला आधीच समजली होती – पृथ्वीराज चव्हाण

152

नाशिक,  दि. १३ (पीसीबी) – सनातन संस्थेची विघातक कार्यपध्दती मला आधीच समजली होती. सनातन दिसते तशी सरळमार्गी नाही. या संस्थेच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी  २०११ पासून मी करत आलो आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.  

नाशिकमध्ये  चव्हाण  आले असता ते पत्रकरांशी बोलताना म्हणाले की, सनातन  संस्था काय काम करत आहे, हे आता पुन्हा एकदा समोर आले आहे. यापूर्वीही त्यांची कामे उघडकीस आली आहेत. तेव्हा मोठी खळबळ  उडाली होती. या संस्थेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी मी केली  होती. याबाबत  लक्ष घालण्याच्या सुचनाही  केल्या होत्या.

चव्हाण म्हणाले  की,  दाभोळकर,  पानसरे,  गौरी लंकेश,  कुलबुर्गी या विचारवंतांच्या हत्येमागे जो विचार आहे, तो देशाची मुलभूत विचारसरणी, डॉ. आंबेडकरांची राज्य घटना याच्या विरोधात आहे. एखाद्याचे विचार पटले नाही की, त्याला संपवून टाका, अशी मनोवृत्ती वाढत  आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी व कृती त्यामध्ये काहीही फरक नाही. सध्या सत्तेवर असलेले त्याच विचाराने सरकार चालवित आहेत. त्यांना  सनदशीर मार्गाने  आगामी २०१९ मधील निवडणुकीत गाडून टाका, असे ते म्हणाले.