‘सनातन’वरुन लक्ष हटवण्यासाठी विचारवंतांना अटक – सुप्रिया सुळे

50

पुणे, दि. ३१ (पीसीबी) – ‘सनातन’ या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेवरील कारवाईवरुन लक्ष हटवण्यासाठी डाव्या विचारधारेच्या विचारवंतांना अटक करण्यात आली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. कुठली पुस्तक वाचायची हे पण सरकारने ठरवायचे का?, असा सवालही त्यांनी विचारला.