सध्या देशाला गांधीवादामुळे त्रास होत आहे – संभाजी भिडे

610

पुणे, दि. ३ (पीसीबी) – सध्या देशाला गांधीवादामुळे त्रास होत आहे, अस वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे. पुण्यातील सदाशिव पेठ येथे राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आलेल्या गणपती मंडळाच्या देखाव्याच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते.

पुण्यातील भाजपाचे नगरसेवक धीरज घाटे यांच्या साने गुरुजी तरुण मंडळाने यावेळी अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. मंडपात प्रवेश करताच भव्यदिव्य प्रवेशद्वार साकारण्यात आले असून प्रभू रामाची मूर्तीही ठेवण्यात आली. यासाठी एकूण १५ लाखांचा खर्च करण्यात आला. संपूर्ण देखावा भगवामय करण्यात आला आहे.

संभाजी भिडे यांनी मंडळाला भेट देत उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “आपल्याला गांधीवादातून सुटका करुन घ्यायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा आदर्श घेतला पाहिजे”.“जेव्हा गरज लागते तेव्हाच देव हाती शस्त्र घेतात. यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला त्या स्वरुपात दिसतो.