सध्या उद्धव ठाकरे सगळ्या घरांचे बिग-बॉस आहेत, ते जसे सांगतील तसे ऐकावे – तृप्ती देसाई

191

 

पुणे, दि.२३ (पीसीबी) – देशात आणि राज्यात कोरोनाच्या कसेस दिवसागणिक वाढत आहेत. प्रशासन, सरकार, मुख्यमंत्री , पंतप्रधान सगळ्यांकडून नागरिकांना घराबाहेर पडू नका. गर्दी करू नका अस वारंवार आवाहन केलं जात आहे परंतु रस्त्यावरची गर्दी काही कमी होताना दिसत नाही.

आता शेवटी नाईलाज म्हणून सरकारने सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद केली आहे आणि संचार बंदी लागू केली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत.आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश पाळावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

याच पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई म्हणाल्या, आता शेवटी नाईलाज म्हणून सरकारने सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद केली आहे आणि संचार बंदी लागू केली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत.आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश पाळावे असे आवाहन केले आहे.

पुढे बोलताना म्हणाल्या, त्यामुळे कोरोनाला राज्यातून हद्दपार करण्यासाठी आता बिग बॉस जसे सांगतील तसेच आपल्याला ऐकावे लागेल आणि त्याची अंमलबजावणी करावी लागेल असेही भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्तीताई देसाई म्हणाल्या आहेत.

WhatsAppShare