सद्गुरुनगर येथे घरातून 78 हजारांच्या दागिन्यांची चोरी

182

भोसरी, दि. १८ (पीसीबी) – सद्गुरुनगर भोसरी येथील एका घरातून अज्ञात चोरट्यांनी 78 हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी केली. ही घटना 28 मे ते 4 जून या कालावधीत घडली.

शारदा कैलास ढवळे (वय 50, रा. झोंबाडे चाळ, बालाजी कॉलनी, सद्गुरूनगर, भोसरी) यांनी याबाबत शनिवारी (दि. 17) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 मे ते 4 जून या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घरात उघड्या दरवाजावाटे प्रवेश केला. घरातून 78 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.