सत्ता होती तेव्हा गोट्या खेळत होता का? – इम्तियाज जलील

223

औरंगाबाद, दि.२८ (पीसीबी) – पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नी औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. पंकजा मुंडे यांच्या उपोषणावर टीका करताना इम्तियाज जलील यांनी म्हटले की, “पाच वर्ष केंद्रात आणि राज्यात जेव्हा आपल्या हातात सत्ता होती तेव्हा काय गोट्या खेळत होता का ? त्यावेळी या गंभीर प्रश्नासाठी तुम्ही काही केले नाही. मग आता कशाला नौटंकी करता”.

“सत्ता होती तेव्हा काही केले नाही आणि आता तुम्ही औरंगाबादमध्ये एकत्र आले आहात. आम्ही काय इतके मूर्ख नाही. जनता मूर्ख नाही. मी विरोधी पक्षात असूनही हे प्रश्न विचारत आहे. जेव्हा सत्ता होती तेव्हा का नाही केले आणि आता सत्ता गेल्यावर हे नाटक आणि नौटंकी कशासाठी हा प्रश्न तुमचे जे समर्थक आहेत ते देखील विचारतील,” असेही इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

WhatsAppShare