सत्ता जाणार म्हणून महापौरांचा तीळपापड झाला,माया बारणेंचा महापौरांना घरचा आहेर …

76

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – मेट्रोच्या ट्रायल रन साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी (दि.१७) सकाळी फुगेवाडी ते पिंपरी असा मेट्रो प्रवास केल्याने राजकिय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मेट्रोच्या भेटीबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आणि पाठोपाठ महापौर माई ढोरे यांनी पवार यांना वैधानिक अधिकाराचा मुद्दा उपस्थित केला आणि टीकेची झोड उठवली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षांसह अनेकांनी भाजपाचा उद्धार करताना कोथरूडच्या आमदार पाटील यांचा शहरातील प्रकल्पांची उद्धाटने करण्याचा काय अधिकार असा रोखठोक सवाल केला. महापौरांनी आजवर पवार यांच्या जीवावर किती पदे उपभोगली याचाही उद्धार राष्ट्रवादीने केला. हे थोडे झाले म्हणून की काय म्हणून आता भाजपाच्याच नगरसेविका माया बारणे यांनीही महापौर माई ढोरे यांना सुनावले आणि सत्ता जाणार आहे म्हणून तीळपापड झालाय काय, असा सवाल केला आहे. महापौर माई ढोरे यांच्या बुध्दीची किव करविशी वाटते, असे म्हणते माया बारणे यांनी भाजपाचीही लाज काढली आहे.
आपल्या प्रसिद्धीपत्रकात माया बारणे म्हणतात, ५ जानेवारी रोजी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शहरातील विविध प्रकल्पांची उद्धाटने करण्यात आली. पाटील हे कोणी मंत्री आहेत काय त्यांचा या शहराशी काय संबध अशा प्रश्नांची सरबत्ती माया बारणे यांनी केली आहे. थेरगाव येथील उद्धाटनाच्या कार्यक्रम आपल्या प्रभागात असताना मला एक दिवस अगोदर कळविण्यात येते. या शहराच्या जडणघडणीत मोठे योगदाना असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण द्यावे म्हणून तीन महिन्यांपासून आपण पाठपुरावा केला, मात्र ते उद्धाटन पाटील यांच्या हस्ते केले. महापौर पदाला हे कृत्य शोभनिय नाही. महामेट्रो म्हणजे भाजपाची मक्तेदारी आहे का आदरणीय पवार साहेब हे देशाच्या राज्यसभेचे खासदार आणि या शहराच्या विकासाचे साक्षिदार आहेत, याचे भान महापौरांनी ठेवावा, असा इशारा माया बारणे यांनी दिला.