सत्ताधारी भाजप कार्यकर्त्याचे घर पावसात जलमय

35

– वाकड परिसरातील अनेक नागरिकांना पावसाचा फटका

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या गलथान कारभाराचा प्रसाद वाकड, काळाखडक येथील नागरिकांना मिळाला. राजकीय वादात विकास कामांची बोंब झाली आहे. रविवारी मध्यरात्री दोन ते तीन च्या सुमारास प्रंचड पावसाने पाणी तुंबले आणि ड्रेनेजचे पाणी घराघरांतून शिरले. भाजपचे जेष्ठ् कार्यकर्ते महेश कुलकर्णी यांच्या वाकड येथील चंद्रमाऊली गार्डन मंगल कार्यालयाच्या मागील घरात सहा इंच पाणी भरले होते. परिसरातील बहुसंख्य घरे अशीच जलमय झाली होती. रात्रीभर जागून घरात शिरलेले पाणी उपसून काढण्याची वेळ नागरिकांवर आली.

WhatsAppShare