सतेज पाटील यांच्याविरोधात तगडा उमेदवार

141

कोल्हापूर, दि. ११ (पीसीबी) : विधानपरिषदेच्या निवडणूकीसाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याविरोधात भाजपने दंड थोपटले असून आज गुरुवारी त्यांची रणनिती ठरणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्षेत्रात ही निवडणूक होणार असून भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. पालकमंत्री पाटील यांच्याविरोधात तगडा उमेदवार उभा करण्यासाठी रणनिती आखली असून माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांची नावे आघाडीवर असली तरी जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे, प्रा. जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

विधानपरिषदेचे निवडणूकीचे बिगुल वाजल्यावर पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. दिपावलीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी प्रत्येक तालुका आणि नगरपालिका सदस्यांशी वैयक्तिक संपर्क साधला आहे. निवडणूक जाहीर झाल्यावर पालकमंत्री पाटील यांच्यासह आमदार ऋतुराज पाटील जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि मतदारांची वैयक्तिक भेट घेत आहेत.

WhatsAppShare